Jyoti Waghmare : सोलापूरच्या गल्लीतून थेट दिल्लीच्या दरबारी! राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे भावूक

ज्योती वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सोलापूरच्या गल्लीत अत्यंत गरिबीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते. लहानपणी पायात चप्पलही नसायची...

Jyoti Waghmare : सोलापूरच्या गल्लीतून थेट दिल्लीच्या दरबारी! राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर ज्योती वाघमारे भावूक

Jyoti Waghmare gets Rajyasabha Candidature : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सोलापूरच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्या ज्योती वाघमारे यांना शिवसेनेने (शिंदे गट) राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, ज्योती वाघमारे यांनी या संधीला “लाडक्या भावाने लाडक्या बहिणीला दिलेली ओवाळणी” असे संबोधले आहे.

अनवाणी पायाने चालणारी मुलगी आता संसदेत
ज्योती वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, सोलापूरच्या गल्लीत अत्यंत गरिबीत त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते. “शाळेत असताना पायात चप्पल नसायची आणि अनवाणी पायाने रस्त्यावर चालणारी मुलगी आज दिल्लीला जातेय, यावर विश्वासच बसत नाही,” असे म्हणताना त्यांना अश्रू अनावर झाले.ही उमेदवारी केवळ त्यांची नसून ती बाबासाहेबांच्या पेनाची, सावित्रीबाईंच्या पाटीची आणि संविधानाने दिलेल्या अधिकाराची आहे, असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

‘राजकारणासाठी मोठा बाप लागत नाही’
मुलाखती दरम्यान वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, राजकारणात येण्यासाठी मोठी नावे किंवा वशिल्याची गरज लागते असा समज आहे, मात्र एकनाथ शिंदे यांनी तो खोटा ठरवला आहे. “मी मोठ्या बापाची पोरगी नाही, पण जर तुम्ही प्रामाणिकपणे धडपड करत असाल, तर मुख्य नेत्याचे तुमच्याकडे लक्ष असते,” अशा शब्दात त्यांनी शिंदेंच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका दलित कुटुंबातील मुलीला देशाच्या वरिष्ठ सभागृहात संधी देऊन शिंदेंनी सामाजिक न्यायाचा नवा पायंडा पाडला आहे.

हेही वाचा – Middle East War: युद्धभूमीतून मायदेशी सुखरूप परतली ‘ही’ मराठी अभिनेत्री; एकनाथ शिंदेंच्या एका कॉलने फिरली चक्रे

नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया
राज्यसभेच्या या जागेसाठी शिवसेनेतून अनेक ज्येष्ठ नेते इच्छुक होते. विशेषतः माजी खासदार आनंद अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. यावर भाष्य करताना ज्योती वाघमारे यांनी सांगितले की, सर्व इच्छुक नेते ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत, त्यांच्या कर्तृत्वाचा मी सन्मान करते. मात्र, एका गरीब दलित कन्येला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत आणि पक्षाचे सर्व नेते त्यांना पाठबळ देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यसभेत ‘वंचितांचा आवाज’ बनणार
देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेल्यानंतरची आपली भूमिका स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, “व्हॉइसिंग द व्हॉइसलेस” (Voicing the Voiceless) हेच त्यांचे ध्येय असेल. ज्यांचा आवाज आजवर दाबला गेला, त्या शोषित, वंचित आणि लाडक्या बहिणींचे प्रश्न त्या संसदेत मांडणार आहेत. तसेच देशाच्या विकासाच्या धोरणांवर आणि सामाजिक विषयांवर बौद्धिक मंथन करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता (Common Man’s Leader) कशा प्रकारे सामान्य महिलेला न्याय देऊ शकतो, हे एकनाथ शिंदेंनी या उमेदवारीतून सिद्ध केले आहे.

हेही वाचा – Rajya Sabha Elections : शिवसेनेच्या आक्रमक, अभ्यासू नेत्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी?, सेनेत अवघ्या दोन जागांसाठी अनेक दिग्गज नेते इच्छुक 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number